Kalamba Lake Kolhapur : अखेर कळंबा तलाव ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहू लागला; निम्म्या कोल्हापूरची चिंता मिटली
गेल्या अनेक दिवसांपासून चिंता लागून राहिलेला कोल्हापूर शहराला लागून असलेला कळंबा तलाव अखेर भरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतलाव तुडुंब भरल्याने निम्म्या कोल्हापूर शहरासह कळंबा, पाचगावचा पाणी प्रश्न सुटला आहे.
कोल्हापूर महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीकडून पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरासह कळंबा, पाचगावसाठी कळंबा तलाव भरणे अत्यावश्यक आहे.
येथील नागरिकांना तलावामधून बारमाही पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या चार महिन्यांपासून तलाव कोरडा पडला होता.
गेल्या वर्षीपेक्षा जवळपास आठ दिवसांनी तलाव उशिरा ओव्हर फ्लो झाला आहे.
गेल्या आठवडाभरापासून झालेल्या पावसाने तलावाच्या पाण्यात वेगाने वाढ झाली.
पात्र, कोरडे गाळही काढण्यात आला आहे, त्यामुळे पाणीसाठा आणखी वाढला आहे.
तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.
मात्र, आठवडाभर पडलेल्या दमदार पावसामुळे तलावात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तलावातून पाणी उपसा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.
कळंबा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी बाहेर पडल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज रविवार असल्याने सांडव्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी झाली आहे.
कळंबा तलाव परिसरात गर्दी वाढल्याने बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे, रंकाळा तलाव पूर्ण भरण्याची अजूनही प्रतीक्षा आहे.