Kolhapur News : कोल्हापुरात स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छतेसाठी सर्व नागरीकांनी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदि.1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS) 2023 अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात सकाळी 10 ते 11 या वेळेत स्वच्छता करण्यात आली.
यामध्ये महालक्ष्मी मंदीर परिसर, रेल्वे स्टेशन, टेंबलाई मंदिर परिसर, तोरस्कर चौक मेनरोड, पाडळकर मार्केट परिसर, विकास हायस्कूल रोड, आयटीआय रोड, क्रीडा संकूल रोड, सायबर कॉलेज रोड, यादवनगर, सदरबाजार मेनरोड, शिये फाटा मेन रोड, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर मार्केट रोड, शिरोली जकात नाका ते तावडे हॉटेल मेनरोड, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अंबाबाई परिसरात या मोहितमेचा शुभारंभ केला.
यानंतर त्यांनी या परिसरात स्वच्छता करुन, रेल्वे स्टेशन, टेंबलाईवाडी येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
या मोहिमेत महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, आयकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC, NSS, नागरिक इत्यादिंना सहभाग नोंदवून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता केली.
image 9
image 10