Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swachhata Hi Seva campaign : पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र!
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Gandhi Jayanti) यांच्या 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या जयंतीच्या 154 व्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी (1 ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे. या स्वच्छता अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केलं.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यामध्ये पंतप्रधान मोदी आणि कुस्तीपटूअंकित बैयनपुरिया स्वच्छ आणि स्वस्थ भारताचा संदेश देत आहेत.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आज स्वच्छता मोहिमेला हातभार लावून देशवासियांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
सप्टेंबरच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केलं होतं.
यावेळी त्यांनी ''1 तारीख, 1 तास, एक साथ'' असा नारा दिला होता. श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलं.
यावेळी ते म्हणाले- स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. आजच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणे निवडण्यात आली आहेत.