Kolhapur Airport : बंगळूर-कोल्हापूर-मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरु होणार ; जाणून घ्या वेळापत्रक
कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दैनंदिन विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार एअर कंपनीकडून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
वेळापत्रकानुसार सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी बंगळूरहून कोल्हापूरकडे विमान उड्डाण घेईल आणि 10 वाजून 20 मिनिटांनी विमान कोल्हापूरला येईल.
त्यानंतर 10 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान मुंबईत 11 वाजून 50 मिनिटांनी पोचेल.
दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात 4 वाजून 40 मिनिटांनी पोचेल आणि तेच विमान 5 वाजून 10 मिनिटांनी बंगळूरला रवाना होईल.
दैनंदिन विमानसेवा सुरू झाल्यामुळे, कोल्हापूरच्या उद्योग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या ही विमानसेवा आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरूवार व शनिवार या चार दिवशी आहे.
कोल्हापूर विमानतळावरून बंगळूर आणि मुंबईला दररोज सेवा सुर झाल्याने मोठा फायदा होणार आहे.