Home Decoration Tips : तुमचे घर वेगळ्या स्टाईलमध्ये सजवायचे आहे, 'या' डेकोरेशन टिप्स फॉलो करा, तुमचे घर दिसेल सुंदर
प्रत्येकाला आपले घर सजवायचे असते आणि सुशोभित करायचे असते. घराच्या सजावटीसाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. परंतु अनेक वेळा प्रयत्न करूनही आपल्याला हवे तसे घर सजवले जात नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघर सजवण्यासाठी प्रत्येकाची स्वतःची पसंती असते. काहींना साध्या पद्धतीने घर सजवणे आवडते. तर काहींना रंगीबेरंगी सजावट आवडते. अशा परिस्थितीत काही टिप्स फाॅलो केल्या तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घर सजवू शकता.
घराच्या सजावटीत घराच्या भिंतींची सजावट चांगली व्हायला हवी. अशा परिस्थितीत घर सजवण्यासाठी तुम्ही वॉल पेपरचा वापर करू शकता. जर तुम्हाला रंगीबेरंगी सजावट आवडत असेल तर तुम्ही रंगीत वॉल पेपर वापरा. जर तुम्हाला साधी सजावट आवडत असेल तर तुम्ही साधे वॉल पेपर वापरू शकता.
घराच्या सजावटीत पडदे आणि कुशन कव्हर्सची सजावटही महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत फ्लोरल प्रिंट किंवा अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेले पडदे वापरावेत. याशिवाय कलरफुल कुशन कव्हर्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचे घर सजवण्यासाठी त्यांचा वापर करू शकता.
तुम्ही कोणत्याही खोलीची थीम तयार करण्यासाठी लॅम्पचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या खोलीत विविध प्रकारचे लॅम्प लावू शकता. तुमच्या पलंगाच्या दोन्ही बाजूला साईड टेबल ठेवा आणि त्यामध्ये सोनेरी रंगाचा लॅम्प ठेवा.
तुमच्या बेडला रॉयल लूक किंवा कोणत्याही प्रकारचा थीम लुक देण्यासाठी बेडवर वेगवेगळ्या प्रकारच्या लहान आणि मोठ्या आकाराच्या उशा आणि कुशन वापरा. तुम्हाला रॉयल लुक हवा असेल तर बेडशीट, उशा आणि एकाच रंगाचे पडदे वापरा, तर वायब्रंट थीम हवी असेल तर कलरफुल प्रिंट्स वापरा.
तुम्ही हँडक्राफ्ट्स वॉल हँगिंग्जच्या मदतीने तुमचे घर सुंदर बनवू शकता. बाजारात अनेक प्रकारचे सुंदर वॉल हँगिंग्ज उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला क्राफ्ट वर्क माहित असेल तर तुम्ही घरच्या घरी वॉल हँगिंग्ज देखील तयार करू शकता. सजावटीसाठी ड्रीम कॅचरचा वापर केला जाऊ शकतो.
विंटेज फर्निचर तुम्ही घर सजवण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या फर्निचरला रंगीबेरंगी रंगही देऊ शकता. यामुळे तुमच्या घराला वेगळा लुक येऊ शकतो.
घराला सौंदर्य आणण्यासाठी मुख्य दरवाजाची सजावट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही फुले किंवा मातीपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू वापरू शकता.
बाजारात अनेक वनस्पती उपलब्ध आहेत ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या घरात सजावट म्हणून करू शकता. यासाठी तुम्ही सुंदर भांडे किंवा काचेचे भांडे देखील वापरू शकता. ज्यामुळे ते तुमच्या घराची शोभा वाढवतील.