Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
Kirit Somaiya kolhapur : हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या कोल्हापुरात; करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे घेतले दर्शन
भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत
मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केलं आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसने किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
रेल्वे स्थानकावर त्यांनी पोहोचताच माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, काही मंत्र्यांवर कारवाई झाली आहे, काहींवर होत आहे, म्हणून शक्ती मागण्यासाठी आलो आहे.
कारवाई झाल्यानंतर हसन मुश्रीफांना धर्म आठवला. मात्र, आता कारवाई सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणी प्रभाव पाडू शकत नसल्याचे सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
मुश्रीफ यांनी रविवारी थेट व्हिडिओ व्हायरल करत छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते, याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे म्हटले आहे.