कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाने इतिहासात प्रथमच तळ गाठला

कोल्हापूर जिल्ह्यात धरणांची पाणीपातळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खालावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काळम्मावाडी धरण इतिहासात प्रथमच कोरडं पडलं आहे.

धरणात आजघडीला केवळ 1.31 टीएमसी पाणीसाठा आहे.
गतवर्षी याचदिवशी 6.14 टीएमसी पाणीसाठा होता.
त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोल्हापूर शहराला पाणीपुवठा करणारी थेट पाईपलाईन योजना काळम्मावाडी धरणामधूनच आहे. ही योजना पूर्णत्वास जात आहे.
दुसरीकडे, राधानगरी धरणात फक्त 1.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामधील 1 टीएमसी मृत पाणीसाठा, तर 0.66 टीएमसी वापरता येणार आहे.
त्यामुळे चालू आठवड्यापुरताच पाणीसाठा जिल्ह्यात शिल्लक आहे.
धरणाने तळ गाठल्याने तळापासून ते पार टोकापर्यंत धरणांच्या भिंती दिसू लागल्या आहेत.
काळम्मावाडी धरणातील पाणी दूधगंगा नदी, डावा कालवा आणि उजवा कालवा यामधून सिंचनासाठी विसर्गित केले जाते. शिवाय गैबी बोगद्यामधून भोगावती नदीपात्रात सोडले जाते.