International Yoga Day 2023: पंकजा मुंडेंचा संभाजीनगरात तर प्रीतम मुंडेंचा परळीत योगा, पाहा फोटो

International Yoga Day 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात आणि राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Pankaja Munde and Pritam Munde Celebrated International Yoga Day 2023

1/7
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देखील योगा कार्यक्रमात भाग घेतला.
2/7
पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील तर प्रीतम मुंडे यांनी परळीत आयोजित करण्यात आलेल्या योगा शिबिरात सहभाग नोंदवला.
3/7
छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात योगा शिबीर आयोजित करण्यात आले होते, तर याच शिबिरात पंकजा मुंडे यांनी देखील योगा केला.
4/7
तर यावेळी पंकजा मुंडे यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहकार मंत्री असलेले अतुल सावे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
5/7
तर दुसरीकडे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील परळीत योग शिबिरात सहभाग नोंदवला.
6/7
परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात प्रीतम मुंडे यांनी सहभागी होऊन योग अभ्यास केला.
7/7
तर दैनंदिन योगाभ्यासापेक्षा आजचे योगकर्म विशेष होते, कारण परळी शहरातील असंख्य महिला,तरुणी आणि विविध क्षेत्रातील माझ्या कर्तृत्वान भगिनी माझ्यासोबत सहभागी होत्या, असे त्या यावेळी म्हणाल्या.
Sponsored Links by Taboola