Jotiba Chaitra Yatra : पालकमंत्री दीपक केसरकरांकडून सपत्नीक जोतिबाचे दर्शन; मानाच्या सासनकाठीचे पूजन
श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. 1 या मानाच्या सासन काठीचे पूजन करण्यात आले.
त्यांच्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.
जोतिबाच्या नावानं चांगभल...! च्या जयघोषात महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक सासनकाठ्या नाचवत सहभागी झाले आहेत.
या सर्व भाविकांना पालकमंत्री केसरकर यांनी जोतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन केले.
जोतिबा मंदिरात भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राचे दालन 24 तास कार्यरत ठेवले असून या केंद्राची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
दरम्यान, पायथा ते मंदिरापर्यंत केएमटीची भाविकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे.
स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे मोफत नियोजन करण्यात आलं आहे.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात आहे.