Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 711 तर दिल्लीत 521 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना (Coronavirus) व्हायरसच्या प्रादुर्भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली (Delhi), महाराष्ट्र (Maharashtra) नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 218 रुग्ण मुंबईत आढळले आहेत.
राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना प्रादुर्भावामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,792 आहे.
राज्यात गेल्या सात दिवसांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के आहे.
महाराष्ट्रात 3,792 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सध्या 1,162 सक्रिय रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्हिटी दर 13.17 टक्के आहे.