भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी; बादशाह रेडा, बिजली म्हस, गायी, बैल, चिनी कोंबड्या आकर्षण
कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडवर भीमा कृषी प्रदर्शन सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रदर्शनात अनेक प्राणी, पक्षी, पाळीव जनावरे पाहण्याठी आकर्षण आहेत.
भीमा कृषी प्रदर्शनाचे 26 जानेवारी रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या भीमा कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धंनजय महाडिक यांनी आवाहन केलं आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून वेगळी उत्पादने घेऊन पैसा मिळविणे काळाची गरज असल्याचे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
मुऱ्हा जातीचा 12 कोटी रुपयांचा बादशहा रेडा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
त्याचीच बहीण 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैसही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
बादशाह रेडा व बिजली म्हशीला 2 भाऊ आणि 4 बहिणी आहेत.
याबरोबरच या भीमा कृषी प्रदर्शनात कडकनाथ कोंबड्या, गायी, बैल, म्हैशी, चिनी कोंबड्या घोडे व अन्य जनावरे पहावयास मिळणार आहेत.
हे प्रदर्शन 29 जानेवारी म्हणजेच रविवारपर्यंत असणार आहे.