कोल्हापूरच्या पोरींचा नादच खुळा! पॉकेट मनीमधून शहरात कॉन्वेक्स मिरर बसवले
कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरक्षित आणि विनाअपघात व्हावी यासाठी ड्रीम टीमच्या तरुणी सरसावल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉलेजमध्ये जाणाऱ्या या तरुणींनी पॉकेट मनीमधून शहरात कॉन्वेक्स मिरर बसवले आहेत.
कोल्हापूर शहरात अनेक ब्लाइंड स्पॉट आहेत, त्यामुळे रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसवले आहेत.
कोल्हापूर शहरात सुरुवातीला 6 ठिकाणी हे मिरर बसवले आहेत.
त्यासाठी स्वतःच्या खर्चातील पैशात या तरुणींनी बचत केली आहे.
या ड्रीम टीममध्ये केवळ 5 तरुणी आहेत, पण आपल्या पद्धतीने शहरात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक काम करत आहेत. त्यांच्या या कामाचं कौतुक करावे तितके कमी आहे.
ड्रीम टीमच्या माध्यमातून व कोल्हापूर महानगरपालिकेचे सहकार्याने कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर सहा ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसवणेत येणार आहेत.
या सहा ठिकाणी 90 डिग्री वळण घेताना अचानक येणारी वाहने न दिसल्यामुळे या अगोदर बरेच अपघात झाले आहेत.
अपघात मोठे नसले तरी यामधे कायम स्वरुपी शारीरिक इजा व आर्थिक नुकसान झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे.
या उपक्रमासाठी महानगरपालिका, कोल्हापूर पोलिस ट्रॅफिकचे परवानगीचे लागणारे सोपस्कार पार पाडले आहेत.