प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत 'साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्तीवर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ; अंतिम टप्प्याचे काम सुरू
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती विषयावरील चित्ररथ दिसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.
यावर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची 10 अशी एकूण 27 चित्ररथे कर्तव्य पथावर झळकणार आहेत.
यंदा महाराष्ट्रातर्फे ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती’ विषयावर आधारित चित्ररथ आहे.
महाराष्ट्र राज्याचे यापूर्वी 40 वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर झालेले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ आहे.
या माध्यमातून नारी शक्ती राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
महाराष्ट्रात महत्वाची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तिपीठे आहेत. तर, वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे.
या शक्तिपीठांना स्त्री शक्तिचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे.
चित्ररथाच्या पुढील दर्शनिय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे.
समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी , गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा आहेत. यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती दिसणार. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत.
चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दिसणार आहे. अशी माहिती श्री चवरे यांनी यावेळी दिली.