Keshavrao Bhosale Natyagruha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादांकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी
कोल्हापूरचा मानबिंदू असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली.
त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जशा कोल्हापूर वासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत.
अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले, असे त्यांनी साांगितले.
दरम्यान, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटी पेक्षा कितीही रक्कम लागू दे सरकार द्यायला तयार आहे, मात्र केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बनवा अशा शब्दात अजितदादा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज (11 ऑगस्ट) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत. नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच भेट दिली होती.
अजितदादा पवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत याच्याकडून घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेतली.
शिवाय नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्या सूचना केल्या.
त्याचबरोबर शाहू खासबाग मैदानाची पाहणी करत असताना अधिकाऱ्याना खडे बोल सुनावले.