Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई किरणोत्सव; सूर्यकिरणं देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली
Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. दरम्यान, आजपासून किरणोत्सव सुरू होत असून तो पूर्ण क्षमतेने होईल, अशी आशा आहे.

Ambabai Mandir
1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली.
2/10
त्यामुळे किरणोत्सवात अडथळे असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं आहे.
3/10
आज सोमवारी किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल, अशी शक्यता आहे.
4/10
किरणोत्सवाचा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.
5/10
सायंकाळी सव्वा पाच वाजता सूर्यकिरणांनी महाद्वार कमानीतून प्रवेश केला. यानंतर 5:25 वाजता किरणे गरुड मंडपात आली.
6/10
पुढील पाच मिनिटांपर्यंत किरणे मंडपाच्या चौथर्यापर्यंत पोहोचली.
7/10
सायंकाळी सहा वाजता कासव चौकात किरणांचा प्रवेश झाला.
8/10
यानंतर वेगाने किरणे पुढे सरकली. सहा वाजून पाच मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरठा ओलांडला.
9/10
सहा वाजून सात मिनिटांनी चांदीचा उंबरठा ओलांडून सहा वाजून 12 मिनिटांनी किरणे कटांगणाजवळ पोहोचली.
10/10
सायंकाळी सहा वाजून 13 मिनिटांनी किरणांनी मूर्तीचा चरण स्पर्श केला. पुढच्या दोन मिनिटांपर्यंत किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली.
Published at : 30 Jan 2023 01:34 PM (IST)