Killari Khandoba Yatra : किल्लारी इथल्या श्री खंडोबाच्या यात्रेची सांगता, छबिना मिरवणुकीत मानाच्या काठ्या सहभागी

येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत लातूरच्या किल्लारी येथील श्री खंडोबाच्या यात्रेची सांगता झाली.

Killari Shree Khandoba Yatra

1/10
'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत लातूरच्या किल्लारी येथील श्री खंडोबाच्या यात्रेची सांगता झाली.
2/10
यावेळी निघालेल्या छबिना मिरवणुकीत मानाच्या काठ्या सहभागी झाल्या होत्या.
3/10
कोविड काळानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन झाल्यामुळे भविकांकडून आनंद व्यक्त केला जात होता ...
4/10
सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत गावात श्रींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
5/10
या मिरवणुकीत 12 गावांतील मानाच्या काठ्यांसह भाविक सहभागी झाले होते.
6/10
भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली.
7/10
त्यामुळे मंदिर परिसर सुवर्णमय झाला होता.
8/10
यावेळी 172 काठ्यांचे गुरु शरणाप्पा कडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
9/10
मिरवणुकीत किल्लारीसह खेड, कोंड, लामजना, तळणी, लिंबाळा दाऊ, सारणी, सांगवी, कुमठा, धानोरा, नागरसोगा, कारला, नांदुर्गा येथील काठ्या आणि वारु सहभागी झाले होते.
10/10
दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Sponsored Links by Taboola