Kolhapur News: कोल्हापुरात 'आपला दवाखाना' आयोजित महाआरोग्य शिबिरात 242 रुग्णांना लाभ
ल्हापुरात 'आपला दवाखाना'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात 242 रुग्णांनी लाभ घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची नोंदणी या शिबरात करण्यात आली.
कोल्हापुरातील ताराबाई पार्कममध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये शिबीरामध्ये विविध व्याधीने त्रस्त असलेल्या 242 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
विविध तज्ज्ञ डाॅक्टरांनी या शिबिरात रुग्णांची तपासणी केली.
तपासणी केल्यानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.
शिबीरासाठी आशा स्वयंसेविकांकडून जनजागृती करण्यात आली होती.
यावेळी मनपाच्या शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर्स उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना व इतर सर्व योजनांची माहिती देण्यात आली.