Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरात पितळी उंबऱ्याजवळ नवा सागवानी दरवाजा सेवेत
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पवैभवाचा एक उत्तम नमुना आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंतराळ मंडपही मंदिर शास्त्राची एक सुंदर संकल्पना आहे. मुख्य मंडप अथवा मध्यमंडप या दोन्ही ठिकाणाहून देवीचे दर्शन घडते.
करवीर निवासिनीच्या अंतराळ मंडपाला पितळी उंबरा असे म्हणून ओळखले जाते.
या पितळी उंबऱ्याजवळील जुना दरवाजा बदलला गेला आहे.
साधारणपणे 510 किलो वजनाचा हा दरवाजा होता. बिजागरी नसल्याने लाकडी व लोखंडी खुंटीनेच हा दरवाजा मंदिराच्या मूळ बांधकामामध्ये बसवला गेला होता.
वारंवारच्या घर्षणामुळे या खुंट्या झिजून तसेच लाकडाच्या आयुर्मानामुळे हा दरवाजा खराब झाला होता.
हा जुना दरवाजा बदलून त्या ठिकाणी सुंदर असा सागवानी लाकडाने तयार केलेला नवा दरवाजा या ठिकाणी बसवण्यात आला.
जुन्या दरवाजापेक्षा वजनाने थोडा हलका परंतु ताकतीने तितकाच भक्कम असा हा दरवाजा कालपासून देवीच्या सेवेत रुजू झाला आहे.
एका अर्थाने भक्तजनांसाठी स्वर्ग असणाऱ्या जगदंबा चरणांच्या प्रवेशद्वाराचा हा दरवाजा मंदिराच्या वैभवात भर घालणारा ठरेल यात शंका नाही.
दिलेल्या सेवेची स्मृती म्हणून जुना दरवाजा तसाच जतन करुन ठेवला जाणार आहे.