Rankala lake Kolhapur : रंकाळा तलाव परिसरात 7 स्थलांतरित प्रजातींसह 29 प्रजातींच्या 158 पक्ष्यांची नोंद
कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळा सुरू असल्यामुळे रंकाळ्याच्या पाणथळ भागात अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी वास्तव्यास आहेत.
यावेळी 7 स्थलांतरित प्रजातींसह 29 प्रजातींच्या एकूण 158 पक्षी आढळून आले.
डिसेंबर महिन्यात रंकाळा तलावावर याआधी झालेल्या पक्षीनिरीक्षणामध्ये सुमारे 30 हून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे.
यातील बहुतांश पक्षी हे पाणथळ परिसंस्थेच्या (Wetland ecosystem) जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतात.
या कार्यक्रमात सहभागी पक्षीनिरीक्षकांचे एक लघुचर्चासत्रही घेण्यात आले.
सुहास वायंगणकर यांनी पक्षांचे निरीक्षण आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास, त्यांचे निसर्गातील योगदान, त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.
. पक्षांच्या स्थलांतरासंबंधी अमोल लोखंडे यांनी विस्मयकारक माहिती दिली.
रंकाळा जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असा परिसर आहे.
. विशेषतः विविध जातीच्या पक्ष्यांसाठी तर रंकाळा हक्काचे आश्रयस्थान आणि अन्नाचा स्रोत आहे.