Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kashmir snow : काश्मीर मध्ये बर्फवृष्टी नाही कारण नेमकं आहे तरी काय ?
काश्मीर खोऱ्यात यावर्षी मोठी बर्फवृष्टीची शक्यता नसल्यानं गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमधील शेतकरी देखील चिंतेत आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील वातावरणात सातत्यानं बदलहोत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणावत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात यावर्षी मोठी बर्फवृष्टीची शक्यता नसल्यानं गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमधील शेतकरी देखील चिंतेत आहेत.
कारण, काश्मीर खोऱ्यातील बर्फवृष्टी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असते.
दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्याने सफरचंद पिकावर परिणाम होतं आहे
बर्फवृष्टी हा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी एकमेव सोर्स असतो. अशात संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारी कोरडा जात असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात काश्मीर खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता
लेह लद्दाख परिसरात देखील यंदा बर्फवृष्टी नाही त्यामुळं तेथील शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होणार आहेत. दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्याने सफरचंद, जर्दाळू, चेरीसारख्या फळांच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.