Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी..
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी होणार आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून त्यांच आज दुपारी 1 वाजता चौकशी होणार आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईडी पथकाने नुकतीच हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली, मात्र त्यावेळी सोरेन तिथे उपस्थित नव्हते. (Photo Credit : PTI)
हेमंत सोरेन मागील 40 तासांपासून गायब होते, त्यानंतर आता ते ईडीसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. (Photo Credit : PTI)
झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक नुकतीच हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. (Photo Credit : PTI)
ईडीने बंगल्यातून हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. (Photo Credit : PTI)
नुकतीच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापेमारी करण्यात आली. ईडीने नोटीस जारी केल्यानंतर 29 जानेवारीपासून सोरेन संपर्कात नव्हते. (Photo Credit : PTI)
या छाप्यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन निवासस्थानी उपस्थित नव्हते. दरम्यान, ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून मोठी रोकड जप्त केली. (Photo Credit : PTI)
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून 36 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून, दोन आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. (Photo Credit : PTI)
ईडी पथकाने सुमारे 13 तास बंगल्यात छापेमारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेमंत सोरेन यांनी ईडीला सांगितले की, ते बुधवारी त्यांच्या रांची निवासस्थानी दाखल होणार आहेत. (Photo Credit : PTI)
हेमंत सोरेन यांना याआधी ईडीकडून चौकशीसाठी 10 वेळा समन्स बजावण्यात आलं आहे, पण ते दरवेळी ईडी चौकशी टाळत होते. (Photo Credit : PTI)