Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri News) येथे 13 नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा (Shree Khandoba) देवाच्या सोमवती यात्रेच्या (Somavati Yatra) अनुषंगाने भाविकांची गर्दीने फुलली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे.
जोडून आलेला शनिवार रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी मंदिरात झाली आहे.
तसेच उद्या सोमवती अमावस्या असल्यामुळे देखील यात्रेच्या निमित्ताने गर्दी होत असते.
त्यामुळे आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरी येऊन दाखल होत असतात.
लग्नसराई तसेच कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भाविक जेजुरी दाखल झालेत.
राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला आहे.