नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या विमानाचे लँडींग झाले. यावेळी, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
विमानाच्या लँडींगवेळी, अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानास वॉटर सलामीही देण्यात आली. त्यामुळे, नवी मुंबईसह मुंबईकरांना या विमानसेवेचा वेगळाच आनंद आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2025 रोजी सुरू होणार असल्याचे समजते.
येथील विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं.
महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 या विमानांचे येथे लँडींग झाले होते, या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे.
हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे. जवळपास 5,945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहेत.