PHOTO: 100 एकरवर सकाळीच तुफान गर्दी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी 'मराठा एकवटला'
जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपण्याच्या 10 दिवस अगोदर म्हणजेच, आज जालन्यात एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात सभा आहे. त्यासाठी रात्रीपासूनच तिथं गर्दी झाली आहे.
अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आदल्या दिवशीच आले आहेत. रात्रभर मुक्काम करुन आज सभेला सर्वजण उपस्थिती लावतांना पाहायला मिळत आहेत.
आजच्या सभेसाठी होणार अलोट गर्दी लक्षात घेत, पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सभेच्या ठिकाणी पहिल्या भागातील जागेवर प्रचंड गर्दी झाली असून, सकाळपासूनच तूफान गर्दी पाहायला मिळत आहे.
सभेच्या ठिकाणी महिलांसह तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. विशेष म्हणजे अनेक वृद्ध महिला देखील सभेच्या ठिकाणी दिसत आहे.
सभेच्या ठिकाणी 'एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे' आशा घोषणा देण्यात येत आहे.
दुपारी 12 वाजता मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे. त्यामुळे जरांगे आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
image 9
image 10
image 11
image 12
image 13
image 14