Silk : जालना मार्केटमध्ये रेशीमची आवक वाढली
परंपरागत पिकांना बगल देत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा रेशीम लागवडीकडे (Silk Cultivation) कल वाढला आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) चांगला फायदा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना (Jalna) येथील रेशीम मार्केटमध्ये आवक वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात येथील रेशीम बाजारात तब्बल 38 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे
गेल्या दोन महिन्यात जालना बाजार समितीत 7 कोटी 23 लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत.
2018-2019 रोजी अस्तिवतात आलेल्या जालना कृषी उत्पन्न बजार समितीमधील या रेशीम मार्केटमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा बोलबाला आहे.
राज्यातील मोजक्या रेशीम मार्केटमध्ये गेल्या 5 वर्षात जालना रेशीम मार्केटचा लौकिक वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ, मराठवाड्यासह गुजरात राज्यातूनही शेतकरी रेशीम विक्रीसाठी जालन्याच्या मार्केटमध्ये येत आहेत.
आज शेतकऱ्यांना जालना कृषी उत्पन्न बजार समितीमध्ये सरासरी 500 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहे. मागील महिन्यात 760 रुपये किलो एवढा उचांकी भाव मिळाला होता
सध्या प्रतिदिन सरासरी 3 टन कोशांची या बाजारात आवक होत आहे. रेशीम मार्केट सुरु झाल्यापासून आर्थिक उलाढालीचा आलेख दरवर्षी वाढताना पाहायला मिळत आहेत.
जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2023 या अवघ्या दोन महिन्यात 1 हजार 200 शेतकऱ्यांकडून 122 टन कोष खरेदीमधून 7 कोटी 23 लाखांची उलाढाल झाली आहे.
मराठवाडा विदर्भातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जवळची आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं तुलनात्मकदृष्ट्या लागवड क्षेत्रातसुद्धा भर पडली आहे.