Jalna Municipal Corporation : राज्यातील 29 वी 'जालना महानगरपालिका' कशी दिसतेय?, पाहा फोटो
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महानगरपालिकेत करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 मे 2023 रोजी महानगरपालिकेचे प्रारुप प्रसिद्ध करुन आठ जून 2023 पर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या.
या काळात 8 हरकती आल्या होत्या. त्या हरकती शासनाकडे पाठवण्यात आल्या होत्या. त्यावरुन शासन स्तरावर निर्णय होऊन जालना नगरपालिकेच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जालना नगरपालिकेला महानगरपालिका जाहीर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती.
जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे.
त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी मागणी करण्यात येत होती.
त्यामुळे प्रशासनाने जालना महानगरपालिकेची घोषणा करून तत्पुर्वी हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.
एकूण आठ हरकती आल्या होत्या. त्यावर विचार करुन अखेर शासनाने महानगरपालिकेचा निर्णय घेतला आहे.