PHOTO : मुलाचा गाडीचा हट्ट पुरवण्यासाठी बापाची आयडिया, भंगारातून जीप बनवली
मित्रांप्रमाणे आपल्याकडेही चारचाकी वाहन असावं, असा हट्ट करणाऱ्या शेतमजूर बापाने स्वतःच जीप तयार केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव जिल्ह्यातील वाकोद गावात शेतमजुराने ही जीप बनवली.
मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी बापाने बनवलेली ही जीप चर्चेचा विषय बनली आहे.
शेतमजूर असलेल्या ज्ञानेश्वर जोशी यांच्या मुलाने आपणही वाहन खरेदी करावं, असा हट्ट धरला होता.
जोशी यांच्या मित्राच्या गॅरेजजवळ उभं असताना, मित्र एका कारची दुरुस्ती करत असताना पाहिलं. यावरुन त्यांना मुलासाठी घरच्या घरी कार बनवण्याची कल्पना सुचली.
ज्ञानेश्वर जोशी यांनी भांगरातून गाडीसाठी लागणारे साहित्य गोळा केलं आणि मित्राच्या सहाय्याने गाडी बनवण्यास सुरुवात केली.
महेंद्राची थार ही गाडी बनवण्याच्या दृष्टीने सोपं असल्याचं लक्षात आल्यानंतर जोशी यांनी महेंद्राची ही जीप लहान आकारात बनवण्याचा निर्णय घेतला.
जवळपास सत्तर हजार रुपये खर्च करुन आणि सलग दोन महिने काम करुन जोशी महेंद्राची थार या प्रकारातील लहान आकारातील जीप बनवण्यात यश मिळवले आहे.
जोशी यांनी बनवलेल्या या जीपमध्ये चार जण सहजरित्या बसू शकतात. त्याचबरोबर चाळीस ते पन्नास किमीचा अॅव्हरेज असल्याने आर्थिक दृष्ट्या परवडणारी असल्याचं मतही जोशी यांनी व्यक्त केलं आहे.
आर्थिक अडचणीतून आपण एका नव्या गाडीची निर्मिती करु शकलो आणि मुलाचा हट्ट पुरवू शकलो याचा आपल्याला खूप आनंद झाल्याचं ज्ञानेश्वर जोशी यांनी म्हटलं.
वडिलांनी घरच्या घरी गाडी बनून देत हट्ट पुरवल्याने खूप आनंद झाल्याचं ज्ञानेश्वर जोशी यांचा मुलगा अर्णवने म्हटलं आहे.