PHOTO: आधार कार्डमध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

आधार आणि तुमचा मोबाईल एकमेकाला कनेक्ट असल्याने आधार वरील डेटा अपडेट करायचा असल्यास फोन सोबत असणं गरजेचं आहे

Continues below advertisement

addhar card

Continues below advertisement
1/9
यामुळेच आजच्या काळात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधार कार्डाशिवाय आपली अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात.आधार कार्डाशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
2/9
आधार आणि तुमचा मोबाईल एकमेकाला कनेक्ट असल्याने आधार वरील डेटा अपडेट करायचा असल्यास फोन सोबत असणं गरजेचं आहे
3/9
तुमचा मोबाईल नंबर नेहमी आधार कार्डशी जोडला गेला पाहिजे कारण कोणत्याही अपडेटसाठी किंवा आधारशी संबंधित कोणत्याही कामासाठी, OTP फक्त तुमच्या आधार नोंदणीकृत नंबरवर येतो.
4/9
फोन नंबर ॲानलाईन अपडेट होत नाही. त्यासाठी आधार सेंटरलाच जावं लागतं. मोबाईल नंबर अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध नाही.
5/9
जर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे असा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करा, जो सक्रिय आहे आणि तुमच्याकडेच आहे.
Continues below advertisement
6/9
तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्र किंवा आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. आधार केंद्रावर, तुम्हाला एक अपडेट/सुधारणा फॉर्म दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला सक्रिय मोबाइल नंबरसह तुमचे सर्व तपशील सादर करावे लागतील.
7/9
फॉर्म भरल्यानंतर, आधार कार्यकारिणीकडे सबमिट करा. यासाठी तुम्हाला 50 रुपये फी देखील भरावी लागेल.
8/9
फॉर्म सबमिट केल्यानंतर आणि फी भरल्यानंतर, तुम्हाला एक पावती दिली जाईल, ज्यामध्ये URN म्हणजेच अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. हा URN क्रमांक अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी वापरला जातो.
9/9
सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डमध्ये 90 दिवसांच्या आत अपडेट केला जाईल.
Sponsored Links by Taboola