Jalgaon Accident : जळगावात स्कूल बसचे स्टेअरिंग रॉड तुटून अपघात, 25 ते 30 विद्यार्थी जखमी
मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग रॉड तुटून नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहूर-शेंदुर्णी रस्त्यावर आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेत बस पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाले.
सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास शेंदुर्णी इथल्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेची बस पहूरहून विद्यार्थ्यांना घेऊन येत होती.
परंतु बस पाचोरा-शेंदुर्णी रस्त्यावर आल्यावर स्टीरिंग रॉड तुटला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात पडली.
तिथे असलेल्या झाडाला बसची जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की झाडाचे अक्षरश: मोडून दोन तुकडे झाले
धडक दिल्यानंतर बस उलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला.
या बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे 30 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले.