Bhandara Marriage : भंडाऱ्यात एक रुपयात बांधल्या आठ नवदाम्पत्यांच्या रेशीमगाठी, बीटीबी भाजी मार्केटचा स्तुत्य उपक्रम
भंडाऱ्यात भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची केवळ एक रुपयात लग्न लावून देण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडाऱ्यातील बीटीबी भाजी मार्केटच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेतमजूर, मार्केट मधील कामगार, चिल्लर भाजीपाला विक्रेते, यांच्यासाठी बीटीबी भाजी मार्केट नेहमी मदतीचा हात देते.
गोरगरिबांसाठी धावून जाणारी मार्केट म्हणून ओळख असलेल्या बीटीबीनं सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता.
यात आठ विवाह लावून देण्यात आले, याबदल्यात वधू - वरांच्या वडिलांकडून केवळ एक रुपया घेण्यात आला.
या सामूहिक विवाह सोहळ्याला हजोरींची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे शेतात राब राब राबून भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा भार काहीसा हलका झाला.
एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात, लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करुन शाहीविवाह अनेकांनी पाहिले असतील.
पण बीटीबी भाजी मार्केटने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.