Ganesh Chaturthi 2022 : जळगावात तब्बल 40 प्रकारच्या मोदकांची मेजवानी
गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2022) रंगत सगळीकडे वाढली असताना जळगावतही हा उत्साह अधिक वाढताना दिसतोय. या उत्साहात आता महिलांचाही उत्साह प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावात माहेर गृप आणि कट्टा सुगरण गृपच्या वतीने महिलांसाठी मोदक (Modak) बनविण्याची स्पर्धा पार पडली. याठिकाणी तब्बल 40 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक महिलांनी बनविल्याचे पाहायला मिळाले.
माहेर गृप आणि कट्टा सुगरण गृप तसेच नगरसेविका सुरेखा तायडे यांच्या वतीने महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
यंदा गणेशोत्सवात महिलांना आनंद मिळावा, त्यांच्यासाठी मोदक बनविणे, थाळी सजविणे, तसेच विविध पद्धतीने खेळ घेण्यात आले.
मोदक बनविण्याच्या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल 40 हून अधिक महिलांनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.
उकडीचे मोदक, खोबऱ्याचे मोदक, चॉकलेटचे मोदक, विड्याच्या पानापासून बनविलेले मोदक, डाळीचे मोदक, पेढ्यांचे मोदक, मोतीचूरचे मोदक असे वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट मोदक या ठिकाणी पहायला मिळाले.
कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपायुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसेविका गायत्री राणे, नगरसेविका सुरेखा तायडे हे सुध्दा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना मोदक टेस्ट करण्याचा मोह आवरला नाही, त्यांनीही या ठिकाणच्या विविध मोदकचा आस्वाद घेतला.
विविध मोदक बनविण्याच्या स्पर्धेसाठी महिलांचाही मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला.