Ganesh Chaturthi 2022 : जालन्यात पर्यावरणपूरक गणपतीचा देखावा; साकारला नवदुर्गांचा अवतार
सध्या घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यामध्ये भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना येथे खाजगी शिकवणी घेणाऱ्या श्रीकांत चिंचखेडकर या शिक्षकाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाडक्या बाप्पाचा पर्यावरण पूरक असा देखावा सादर केला आहे.
यावेळी त्यांनी नवदुर्गांचा आकर्षक असा देखावा तयार केला असून यामध्ये पार्वतीच्या महागौरी, कालरात्री, शैलपुत्री सारख्या 9 अवतरांच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
कुशमंडा ,महागौरी, काळरात्री, ब्रह्मचरिणी ,कात्यायनी, सिद्धीदायिनी, स्कंदमाता, चंद्रघंटा, शैलपुत्री, देखाव्यात हे देवींचे 9 अवतार साकारण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या देखाव्यामध्ये कागदी लगदा, कापूस, बांबू, गवत खळ आणि फुलांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे.
त्यामुळे कोणत्याही कृत्रिम किंवा पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या साहित्याशिवाय सुंदर देखावा तयार करता येऊ शकतो हे श्रीकांत चिंचखेडकर यांनी दाखवून दिलं आहे.
या देखाव्यात त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक सामाजिक संदेशदेखील दिले आहेत.
हा पर्यावरण पूरक देखावा सध्या जालन्यात लोकांचं लक्ष वेधून घेतोय.