In Pics : Women's Day Special : 'या' आहेत भारताच्या सर्वात श्रीमंत महिला, त्यांची संपत्ती किती?

Richest Women
1/6
आज देशासह जगभरात नारी शक्तीच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने भारताच्या अशा महिलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या कठोर परिश्रम, समर्पणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ स्वत:चीच नाही तर देशाचंही नाव उज्ज्वल केलं आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांचं मोलाचं योगदान आहे. जाणून घेऊया या सशक्त महिलांची संपत्ती किती आहे.
2/6
किरण मजूमदार शॉ - Biocon च्या संस्थापक किरण मजूमदार शॉ यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये होते. Hurun Global Rich List 2021 नुसार त्यांची एकूण संपत्ती 4.8 बिलियन डॉलर आहे.
3/6
स्मिता व्ही कृष्णा : गोदरेजच्या वारसदार स्मिता व्ही कृष्णा या Hurun Global Rich List 2021 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4.7 बिलियन अमेरिकन डॉलर आहे. (इमेज क्रेडिट- गूगल)
4/6
मंजू देशबंधु गुप्ता - Lupin Limited चे सहसंस्थापक देशबंधु गुप्ता यांच्या पत्नी मंजू देशबंधु गुप्ता या देखील श्रीमंत महिलांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची एकूण अंदाजित संपत्ती 3.3 बिलियन डॉलर आहे. (इमेज क्रेडिट- ट्विटर)
5/6
लीना गांधी तिवारी - लीना गांधी तिवारी या जेनरिक फार्मास्यूटिकल मॅन्यूफॅक्चरर्स कंपनी USV Private Limited च्या संचालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 21 बिलियन डॉलर आहे. (इमेज क्रेडिट- सोशल मीडिया)
6/6
राधा वेम्बू - Zoho Corporation मध्ये मेजॉरिटी स्टेकहोल्डर असलेल्या राधा वेम्बू यांची एकूण संपत्ती 1.7 अमेरिकन बिलियन डॉलर असल्याचं म्हटलं जातं. (इमेज क्रेडिट- सोशल मीडिया)
Published at : 08 Mar 2022 03:01 PM (IST)