देशातील 'या' पाच राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूची आजही होते चर्चा!
भारतातील काही राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने खळबळ उडाली होती. काही नेत्यांच्या मृत्यूबाबत आजही शंका उपस्थित केली जाते. त्यांचा मृत्यू कसा आणि कोणत्या कारणांनी झाला, याबाबत दावे-प्रतिदावे वारंवार केले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्यापही फारशी स्पष्टता नाही. भारत-पाकिस्तानमध्ये 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद करार झाल्यानंतर त्याच रात्री त्यांचे निधन झाले होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक गूढ राहिले आहे. जपानमधील एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. मात्र, अनेकजण याचा इन्कार करतात. त्यामुळे नेताजी यांचा मृत्यू लोकांसाठी आज एक रहस्य आहे.
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी अल्पावधीत राजकारणात दबदबा निर्माण केला होता. दिल्लीमध्ये 23 जून 1980 रोजी वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या विमान अपघातावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
जनसंघाचे नेते पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले जातात. मुगलसरायजवळ रेल्वे प्रवास करताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक दावे-प्रतिदावे केले जातात.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या औषधातून एलर्जी झाली होती. त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. यावरही अनेक दावे प्रतिदावे केले जातात.