Wrestler's Protest: जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंचा सराव अभ्यास!
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिन्यांपूर्वी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. (PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूं सोबत आज विनेश फोगाट, संगीता फोगा सराव अभ्यास करताना पाहायला मिळालं (PTI)
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. (PTI)
देशातील नामांकित कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर 23 एप्रिल पासून पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे (PTI)
कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु केलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या आंदोलकांनी केली आहे. (PTI)
सात कुस्तीपटूंनी मुलींनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. परंतू, त्यांच्या तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले. (PTI)
पोलीस अधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केली नसून, याबाबत जाणून-बुजून विलंब केला जात असल्याचे मलिक म्हणाल्या. (PTI)
समितीच्या चौकशीत काय निष्पन्न झालं, याबाबत कोणतेही तथ्य मांडण्यात आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे म्हणणे ऐकावं, अशी आमची इच्छा असल्याचं साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितलं. (PTI)
आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असावे हीच आमची इच्छा असल्याचे ते म्हणावे. (PTI)