Jagannath Rath Yatra 2023 : म्हणून सुरु झाली जगन्नाथ रथाची यात्रा, जाणून घ्या 'या' यात्रेविषयी काही खास गोष्टी
दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षात जगन्नाथाच्या यात्रेला सुरुवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी भगवान जगन्नाथ यांच्याशिवाय त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे देखील रथ असतात.
जगन्नाथ यात्रेच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत.
एका पौराणिक कथेनुसार, एकदा देवी सुभद्राने तिचे भाऊ श्री कृष्ण आणि बलराम यांच्याकडे द्वारकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली, ती पूर्ण करण्यासाठी तिघेही रथातून द्वारका शहरात गेले, तेव्हापासून दरवर्षी ही रथयात्रा भरते.
यंदा ही रथयात्रा 21 जून 2023 रोजी समाप्त होईल. शहराला प्रदक्षिणा घालून या दिवशी भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवी गुडीचा मंदिरात त्यांच्या मावशीच्या घरी विश्रांती घेतात असं सांगण्यात येतं.
या यात्रेचा रथ हा कडुलिंबाच्या पवित्र आणि मजबूत लाकडापासून बनवण्यात येतो.
या यात्रेचा रथ बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धातूचा वापर केला जात नाही.
भगवान जगन्नाथ यांचा रथ 832 लाकडांच्या तुकड्यांपासून बनवण्यात येतो.
देवी सुभद्रेचा रथ हा दुर्गा देवीचे प्रतीक मानले जाते. तर बलरामाचा रथ हा शंकराचे प्रतीक असल्याचे मानले जाते.