Heat Wave: कुठे असेल उष्णतेची लाट? कुठे पडेल मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचे ताजे अपडेट्स
20 जून रोजी पूर्व मध्य प्रदेश, तामिळनाडू, मिझोराम, त्रिपुरा, ईशान्य राजस्थान, आसाम आणि मेघालयमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 21 जून रोजी उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि सिक्कीममध्ये 22 जून रोजीही पाऊस सुरू राहू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउष्णतेच्या लाटेबद्दल बोलताना हवामान खात्याने सांगितलं, पूर्व उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, बिहार आणि झारखंडच्या काही भागात 20 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर या राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो.
हवामान खात्यानेही लोकांना सतर्कतेचा इशारा देताना उष्णतेची लाटेपासून बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांनी जास्त वेळ उन्हात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी अधिकाधिक पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवा, त्यासोबतच ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेयांचं सेवन करा.
उष्णतेपासून वाचण्यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी हलक्या रंगाचे, सैल, सुती कपडे घाला आणि कपड्याने, टोपीने किंवा छत्रीने आपले डोके झाकून घ्या.
उत्तर प्रदेशात कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त आणि अस्वस्थ आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत उष्माघातापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी (19 जून) झालेल्या पावसानंतर लोकांना आर्द्रतेपासून दिलासा मिळाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच ऊन देखील पडलं. नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, सफदरजंग, लोधी रोड, IGI विमानतळ आणि आसपासच्या परिसरात वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला.