Mamata Banerjee Net Worth: 12 वर्षांपासून मुख्यमंत्री, 2 लाख वेतन; तरीही देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी
देशातील 30 मुख्यमंत्र्यांच्या यादीत ममता बॅनर्जी या एकमेव मुख्यमंत्री आहेत, ज्या कोट्यधीश नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppADR च्या अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती केवळ 16 लाख आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. देशातील उर्वरित 29 मुख्यमंत्र्यांपैकी 43 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत.
ममता बॅनर्जी यांच्याकडे एकूण 9 ग्रॅम दागिने आहेत, ज्यांची एकूण किंमत 43,837 रुपये आहे. त्याच्याकडे Immovable Assets च्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही.
ममता बॅनर्जींना दीदी या नावानं ओळखलं जातं. ममता बॅनर्जी या अविवाहित आहेत, संपूर्ण बंगालच त्यांचं कुटुंब असल्याचं त्या नेहमी सांगतात.
ममता बॅनर्जी या उत्तम लेखिकाही आहेत. त्यांची अनेक पुस्तकं बेस्ट सेलर आहेत. याव्यतिरिक्त त्या संगीतकारही आहेत.
ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हापासून आजतागायत त्यांनी ना त्यांच्या पगारावर दावा केला आहे किंवा संसदेकडून मिळणाऱ्या पेन्शनमध्येही त्यांनी वाढ केलेली नाही.
ममता बॅनर्जींनी कोलकाता विद्यापीठातून एलएलबी आणि एमए केलं आहे. त्यांनी 1998 मध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.