Government Scheme: मत्स्यशेतीसाठी सरकार देतेय मोठी मदत; 'या' योजनेंतर्गत मिळणार लाभ
भारत सरकारने देशात मत्स्यव्यवसाय तसेच मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत तलाव खोदण्यासाठी सरकार शेतकरी/मत्स्यपालकांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारच्या या योजनेंतर्गत मत्स्यबीजापासून तलाव खोदाईपर्यंतच्या प्रकल्पासाठी शेतकरी व मत्स्यपालकांना आर्थिक अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत किमान एक बिघा क्षेत्रात तलाव खोदणं बंधनकारक आहे, त्यासाठी 40% अनुदान सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी आणि मत्स्यशेतकऱ्यांना मिळणार असून, 60% अनुदान अनुसूचित जाती आणि जमाती तसेच महिला शेतकरी/मत्स्य उत्पादकांना दिलं जाणार आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी, तुम्हाला योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmmsy.dof.gov.in/ ला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
ज्या अर्जदारांचे तलाव खोदून झाले आहेत ते देखील या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhar Card), अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate), मोबाईल नंबर (Mobile Number), बँक खाते तपशील (Bank Details) आणि मत्स्यपालन कार्ड (fish farming Card) असणं आवश्यक आहे.