Vijay Diwas 2021: 1971 च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे , पाहा दुर्मिळ छायाचित्रे
16 डिसेंबर 1971 रोजी भारताने अधिकृत पाकिस्तानवर विजय मिळवला असल्याची घोषणा केली. त्यामुळे या दिवसाला विजय दिवस असे म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या युद्धात 3900 जवान शहीद झाले. तर, 9851 जखमी झाले.
16 डिसेंबर 1971 रोजी जनरल जेकब यांना तत्कालीन लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांचा एक निरोप मिळाला होता. पाकिस्तानी सैन्य शरणागती पत्करणार असून त्याच्या तयारीसाठी ढाका येथे जावे
पाकिस्तानी सैन्याचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल ए.एके. नियाजी यांच्याकडे ढाकामध्ये 26 हजार 400 सैनिकांची कुमक होती. तरीदेखील भारतीय लष्कराने त्यांची कोंडी केली होती.
त्या दिवशी सुमारे साडे चार वाजण्याच्या सुमारास लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोरा ढाका येथे पोहचले आणि नियाजी यांच्यासोबत शरणागतीच्या दस्ताऐवजावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नियाजी यांनी आपली रिव्हॉल्वर लेफ्टिनेंट जनरल अरोरा यांच्याकडे सुपूर्द केली.
स्थानिक लोक नियाजीची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, भारतीय अधिकाऱ्यांनी नियाजी याला सुरक्षितपणे ढाक्याबाहेर नेले.