'तिचं' मन जिंकण्यासाठी वाघ भिडले; दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ चर्चेत
मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये घडलेल्या दोन वाघांच्या द्वंद्वाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकान्हा नॅशनल पार्कच्या मुक्की झोनमध्ये दोन वाघांच्या लढाईचा हा व्हिडिओ आहे.
नीलानाला आणि बॉईनदाबारा असे लढाई करत असलेल्या दोन नर वाघांचे नाव आहे.
आता या भीषण लढाईचे कारण ही तेवढेच खास आहे.
कान्हा नॅशनल पार्कमधील एका युवा वाघिणीचे मन जिंकण्यासाठी नीलानाला आणि बॉईनदाबारा हे नर वाघ एकमेकाशी भिडले होते.
बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेच्या वेळेला काही पर्यटक तिथे होते.
त्यांनी सर्व घटनाक्रम चित्रीत केले असून तोच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दोन्ही वाघांमध्ये युद्ध सुरू असताना ज्या वाघिणीसाठी ही लढाई झाली ती जिलालाईन वाघीण ही तिथेच फिरत होती.
दोघांमध्ये सुरू असलेले भीषण युद्ध पाहून ती हळूच तिथून निघून गेली.
हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.