Karnataka Mandir : कर्नाटकातील पाच प्रसिद्ध मंदिरं, काय आहे या मंदिराविषयी खास जाणून घ्या सविस्तर
मुरुडेश्वर मंदिर (Murudeshwar Temple) - मुरुडेश्वर मंदिर कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यांत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइथे शंकराच्या विशाल मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. असं म्हटलं जातं की शंकराची हि मूर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे.
श्रीकृष्ण मंदिर (Krishna Temple, Udupi) - कर्नाटकातील उडुपी शहरात श्रीकृष्णाचे विलक्षण मंदिर आहे. तेराव्या शतकात माधवाचार्यांनी या मंदिराची स्थापना केली होती.
अशी मान्यता आहे की, कृष्णाचा भक्त कनकदासला इथे श्रीकृष्णाची भेट घेण्यापासून रोखण्यात आळे होते. त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाची मूर्ती छोट्या खिडकीतून पाहिली. तेव्हापासून श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे थेट न पाहता खिडकीतूनच पाहिले जाते. अशी इथली परंपरा आहे.
विठ्ठल मंदिर (Vitthal Temple, Hampi) - कर्नाटकातील हंपी शहरात सोळाव्या शतकात विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिरातील बारीक नक्षीकाम पर्यकांना भुरळ घालते.
हे मंदिर त्यात करण्यात आलेल्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. हे विठ्ठला मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.
गोकर्ण महाबळेश्वर मंदिर (Mahabaleshwar Temple, Gokarna) - या मंदिराचा उल्लेख रामायण आणि महाभारतात आढळून येतो. गोकर्णच्या महाबळेश्वरच्या मंदिराला दक्षिण काशी म्हटले जाते.
शंकराचे हे मंदिर द्रविड वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
विद्याशंकर मंदिर (Vidhya Shankar Temple) - श्रृंगेरी या शहरातील विद्याशंकर मंदिर हे शंकराचार्यांसाठी श्रध्दांजली आहे.
तेराव्या शतकात स्थापन करण्यात आलेले हे प्राचीन मंदिर स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.