Indian Rupees: कोणती आहेत भारतीय नोटांवरील छायाचित्र?
एक रुपयाची नोट 30 नोव्हेंबर 1917 रोजी छापण्यात आली. या नोटेवर एका तेल अन्वेषण केंद्राचे चित्र आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही नोट रिझर्व्ह बँक नाही तर अर्थ मंत्रालयाकडून छापण्यात येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता दोन रुपयांची नोट छापण्यात येत नाही. जुन्या दोन रुपयांच्या नोटेवर अशोक चक्राचे छायाचित्र आहे. तर नोटेच्या मागील भागावर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टचे चित्र आहे. ही नोट विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगती दर्शवते.
पाच रुपयांची नोट देखील आता आरबाआयकडून छापण्यात येत नाही. या नोटेवर पुढे महात्मा गांधी आणि मागे शेतीचे छायाचित्र छापण्यात आले आहे. ही नोट भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीचे महत्त्व पटवून देते.
दहा रुपयांच्या नोटवर पुढे महात्मा गांधी तर मागे कोणार्कचे सूर्यमंदिर आहे.
20 रुपयांच्या नोटवर तुम्हाला वेरुळच्या लेणीचे छायाचित्र पाहायला मिळेल.
200 रुपयांच्या नोटवर प्रसिद्ध सांची स्तूपाचे छायाचित्र आहे.
100 रुपयांच्या नोटवर तुम्हाला गुजरात राज्यातील राणीचा वाव म्हणजे प्रसिध्द विहिर आहे.
500 रुपयांच्या नोटवर लाल किल्ल्याचे छायाचित्र आहे.
2000 हजारांच्या नोटवर भारताच्या मंगळयानाचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र भारतातील वैज्ञानिक समृध्दीचे दर्शन घडवतात.