Swati Maliwal Latest Marathi News: मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, नेमकं काय घडलं?
Swati Maliwal Latest Marathi News: आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (image credit-PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणी प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय साहायक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (image credit-PTI)
वडिलांवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना स्वाती मालीवाल यांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबाबत मोठा खुलासा केला होता. वडिलांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वामी मालिवाल यांनी केला होता. (image credit-PTI)
कोण आहे स्वाती मालीवाल?- 2015 मध्ये स्वाती मालीवाल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख बनल्या. अलीकडेच आम आदमी पक्षाने त्यांना दिल्लीतील राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार केले होते. 31 जानेवारी रोजी त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. (image credit-PTI)
वडिलांवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना स्वाती मालीवाल यांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबाबत मोठा खुलासा केला होता. वडिलांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वामी मालीवाल यांनी केला होता. (image credit-PTI)
रागाच्या भरात वडील तिचे केस धरून तिला मारहाण करायचा. त्यामुळे भीतीने ती अनेकदा पलंगाखाली लपून बसायची. तिने अशाच अनेक रात्री लपून काढल्या आहेत, असं स्वाती मालिवाल यांनी सांगितले. (image credit-PTI)
नेमकं प्रकरण काय?- स्वाती मालिवाल सोमवारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेल्या होत्या. त्या तिथे केजरीवाल यांची वाट पाहात होत्या. तेव्हाच तिथे विभव कुमार आले आणि त्यांनी मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन केले. याची माहिती त्यांनी 112 वर फोन करत पोलिसांना दिली. यानंतर स्वाती मालिवाल यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठले. (image credit-PTI)
सदर घटनेनंतर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली होती. ही घटना निंदनीय असून मुख्यमंत्री याप्रकरणी कारवाई करतील असंही आपकडून स्पष्ट करण्यात आलं. आपचे खासदार संजय सिंह यांनीही स्वाती मालिवाल यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) विभव कुमार यांना समन्स बजावले आहे. (image credit-PTI)