शिमला नव्हे हे तर सौदी अरेबिया, पाहा बर्फवृष्टीनंतरचे दृश्य
वाळवंट आणि भीषण उन्हाळा यासाठी सौदी अरेबिया प्रसिद्ध आहे. मात्र, या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सौदी अरेबियात झालेल्या बर्फवृष्टीने नागरिकांना धक्का दिला आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. (twitter: @spafr4)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसौदी अरेबियाच्या उत्तर-पश्चिम शहर ताबूकमध्ये ही बर्फवृष्टी झाली आहे. ताबूक जवळील अल-लवाज पर्वताजवळ हजारो पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. हा भाग बर्फवृष्टीसाठी ओळखला जातो. (twitter: @spafr4)
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातही या भागात बर्फवृष्टी झाली होती. या बर्फवृष्टीने मागील 50 वर्षातला उच्चांक मोडला होता. (twitter: @spafr4)
सौदी अरेबियाच्या उत्तर भागामध्ये अनेक पर्वत आहेत. यामध्ये जबल अल-लावज, अल-ताहीर आणि जबल अल्कान हे बर्फाच्छिद झाले आहेत. जबल अल-लावज हा समुद्रसपाटीपासून 2600 मीटर उंच आहे. या भागात बर्फवृष्टी होत असते. (twitter: @spafr4)
ताबूकचा हा परिसर जॉर्डन देशाच्या सीमेलगत आहे. बर्फ वितळल्यानंतर या भागात सुंदर दृश्य दिसते. (twitter: @spafr4)
सौदीसह आखाती देशांमधील काही ठिकाणी रात्रीचे तापमान उणे अंशावर आहे. अनेक भागात दिवसा उन्हाळा आणि रात्री हिवाळा असे चित्र आहे. (twitter: @hashimumarali)
सौदी अरेबियासह इतर काही वाळवंटी देशांमध्ये बर्फवृष्टी होते. यामध्ये आफ्रिकन देश अल्जेरियाचाही समावेश आहे. (twitter: @hashimumarali)
अनेक पर्यटकांनी सौदीतील बर्फवृष्टीचे छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (twitter: @hashimumarali)