PHOTO : Shashi Tharoor यांचा नारळ फोडताना फोटो व्हायरल; पहा गमतीशीर मीम्स
शशी थरुर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या इलावंचेरी या मूळ गावी ओनमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी भगवती मंदिरामध्ये पूजा केली. (image tweeted by @@ShashiTharoor)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशशी थरुर यांनी ओनमच्या दिवशी नारळ फोडतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्यावर एकाहून एक भन्नाट मीम्स तयार झाले आहेत. (image tweeted by @@ShashiTharoor)
शशी थरुर यांचा हा फोटो वेगवेगळ्या मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियात व्हायरल होत आहे(image tweeted by @@ShashiTharoor)
त्यामध्ये चहा करताना, क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षण करताना, WWE मध्ये प्रतिस्पर्ध्याला धुताना, डान्स करताना आणि अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. (image tweeted by @@ShashiTharoor)
नारळाच्या या मीम्सवरुन होणाऱ्या गमती-जमतीमध्ये शशी थरुर स्वत: सामिल झाले असून त्यांनीही ते मीम्स आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (image tweeted by @@ShashiTharoor)
क्रिकेटच्या मैदानावर दोन फलंदाज एका बाजूला असताना शशी थरुर त्यांना आऊट करण्यासाठी थ्रो करतानाचा मीम्स व्हायरल होतोय. हे आपले आवडते मीम असल्याचं थरुर यांनी सांगितलंय.(image tweeted by @@ShashiTharoor)
शशी थरुर यांच्या इंग्रजीवरुन आधीपासूनच अनेक गमतीशीर मीम्स तयार होतात. त्याचा शशी थरुर हे आनंद घेताना दिसतात. (image tweeted by @@ShashiTharoor)