Jammu-Kashmir Snowfall : जम्मू-काश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदांचं वातावरण
सोमवारी काश्मीर खोऱ्यात आणि लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या काही भागात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली तर, मैदानी भागात पावसामुळे तापमानात घट झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्म-काश्मीरमधील काही ठिकाणी अधूनमधून पाऊस आणि हिमवर्षाव यासह ढगाळ वातावरण आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
IMD ने त्याआधीच जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला होता आणि मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा दिला होता.
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामधील गुरेझ आणि शोपियान-पुंछ मार्गावरील पीर की गली येथे सोमवारी बर्फवृष्टी झाली.
बर्फवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून बांदीपोरा-गुरेझ रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
बद्रीनाथ येथेही सोमवारी येथे जोरदार बर्फवृष्टी झाली.
याशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही बर्फवृष्टी होत आहे.
पर्यटक मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीचा खूप आनंद घेत आहेत.