Rajasthan Survey: राजस्थानात काँग्रेसला गेहलोत-पायलट वादाचा फटका बसणार? सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी
ABP C Voter Survey 2023: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांचं बिगुल वाजलं असून निवडणूक मतदानापूर्वी सीव्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसनं सत्तेत परतण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रचारासाठी भेटी देत आहेत
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयाचा दावा करत आहे, पण निवडणुकीपूर्वी एबीपी न्यूज सीव्होटर्सच्या सर्वेक्षणात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
CVoter च्या सर्वेक्षणात जनतेला विचारण्यात आलं होतं की, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचं किती नुकसान होईल?
सर्वेक्षणात राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचं नुकसान होईल, असं 53 टक्के लोकांचं मत आहे.
सर्वेक्षणानुसार, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचं नुकसान होणार नाही, असं 29 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
याशिवाय गेहलोत-पायलट लढतीमुळे काँग्रेसचं थोडं नुकसान होईल, असं 16 टक्के लोकांचं मत आहे, तर 2 टक्के लोकांनी यावर काहीही बोलू शकत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, निवडणुकीच्या वर्षात काँग्रेस हायकमांडनं दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणलं आहे.
दरम्यान, 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. याच मुद्द्यावर एबीपी न्यूजसाठी सीव्होटरनं सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 2 हजार 649 लोकांनी आपली मतं मांडली आहेत.
सर्वेक्षण 14 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आलं आहे. सर्वेक्षणाचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष पूर्णपणे लोकांशी साधलेला संवाद आणि त्यांनी व्यक्त केलेली मत यावर आधारीत आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.