Bharat Jodo Yatra: सुवर्ण मंदिरात राहुल गांधी झाले नतमस्तक, भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये; पाहा फोटो
'भारत जोडो यात्रे'अंतर्गत पंजाबमधील पदयात्रा सुरू करण्याच्या एक दिवस आधी राहुल गांधी मंगळवारी दुपारी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी ते सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाले. भारत जोडो यात्रेचा हरियाणा येथील टप्पा मंगळवारी अंबाला येथे पूर्ण झाला.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, राहुल गांधी अमृतसरमध्ये काही तास घालवल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी फतेहगढ साहिबला पोहोचतील.
मंदिरात प्रार्थना केल्यानंतर राहुल गांधींनी हा फोटो ट्वीट केला. त्यासोबत त्यांनी लिहिले की, श्री हरमंदिर साहिबमध्ये पोहोचून, गुरूंच्या माध्यमातून मानवी मूल्यांवरची श्रद्धा आणखीन दृढ होते. सत श्री अकाल!''
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी अंबाला कॅंटमधील शाहपूर येथून पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी माजी खासदार आणि काँग्रेस नेते राज बब्बर हेही यात्रेत सहभागी झाले होते.
गुरुवारी ही यात्रा उत्तर प्रदेशातून पानिपतमार्गे हरियाणात दाखल झाली. ही यात्रा पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र मार्गे अंबाला येथे पोहोचली. गेल्या 21 ते 23 डिसेंबर दरम्यान ही यात्रा मेवात, फरिदाबाद आणि हरियाणातील इतर काही भागातून गेली आहे.
ही यात्रा बुधवारी मंडी गोविंदगडमार्गे जाणार असून खन्ना येथे रात्रीचा मुक्काम आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, यात्रेअंतर्गत दररोज दोन टप्प्यात सुमारे 25 किलोमीटरचे अंतर कापले जाईल.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “12 जानेवारी रोजी पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा फक्त सकाळीच काढली जाईल आणि निश्चित अंतर पार केले जाईल. यानंतर लोहरी सणाच्या दृष्टीने त्याच दिवशी दुपारनंतर आणि त्यानंतर 13 जानेवारीला दिवसभर विश्रांती घेतली जाईल.''
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंग हुडा, रणदीप सुरजेवाला, कुमारी सेलजा, केसी वेणुगोपाल, दीपेंद्र हुडा आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदयभान यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते आणि समर्थक हरियाणातील 'भारत जोडो यात्रे'मध्ये राहुल गांधींसोबत सामील झाले.
राहुल गांधी यांनी हरियाणातील विविध गटांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी संघटनांच्या लोकांशी संवाद साधला.