Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi on White T-Shirt: टी-शर्ट, कुर्ता किंवा शर्ट... राहुल गांधी फक्त आणि फक्त पांढरे कपडेच का घालतात?
Rahul Gandhi on White T-Shirt: राहुल गांधी म्हणजे, काँग्रेसमधील मोठा आणि तरुण चेहरा. राहुल गांधी भारतीय राजकारणातील विरोधी पक्षामधील प्रमुख नेते मानले जातात. पण हेच राहुल गांधी आपल्याला नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्येचे दिसून येतात. मग तो कुर्ता असो वा टीशर्ट किंवा मग शर्ट. राहुल गांधी नेहमी पांढऱ्या रंगाचेच कपडे घालतात, असं का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आपण अनेकदा पांढऱ्या कपड्यांमध्ये पाहतो.
पिकनित असो वा एखादी प्रचाराची रॅली. पत्रकार परिषद असो वा बैठक... ते नेहमीच पांढरा टी-शर्ट घालतात.
पांढरा टी-शर्ट, शर्ट किंवा कुर्ता घालण्यामागचं खास कारण आता राहुल गांधींनी स्वतः सांगितलं.
19 जून 2024 रोजी वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी नेहमीच पांढरे कपडे परिधान करण्याचं गुपित सांगितलं आहे.
राहुल गांधी म्हणतात, पांढरा रंग साधेपणाचं प्रतिक आहे आणि म्हणूनच ते पांढरा टी-शर्ट किंवा कुर्ता परिधान करतात.
राहुल गांधींच्या मते, पांढरा टी-शर्ट पारदर्शकता, दृढनिश्चय आणि साधेपणाचं प्रतीक आहे.
54 वर्षांच्या राहुल गांधी हे सोनिया गांधी आणि दिवंगत राजीव गांधी यांचे मोठे चिरंजीव आहेत.